लिनोवाचे ३ स्मार्टफोन ५ सप्टेंबरला भारतात लाँच

नवी दिल्लीः नची कंपनी () भारतात ५ सप्टेंबरला ३ स्मार्टफोन लाँच करणार आहे. गेल्या काही दिवसात लिनोवाचे स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या नवीन स्मार्टफोनकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. ५ सप्टेंबर रोजी , आणि हे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. या तीनही स्मार्टफोनच्या किंमती वेगवेगळ्या असणार आहेत. Lenovo K10 Note हा स्मार्टफोन ग्राहकांच्या बजेटमधील असणार आहे. तसेच हा फोन Lenovo Z6 Lite यासारखा असण्याची शक्यता आहे. हा फोन चीनमध्ये याआधीच लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 710 देण्यात आला आहे. ट्रेंडनुसार या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. Lenovo Z6 Pro हा स्मार्टफोन ६.३९ इंचाचा असून यात अमोलेड फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी ४ हजार एमएएच क्षमतेची आहे. या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे देण्यात आले असून यातील एक कॅमेरा हा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनची किंमत लाँच झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. Lenovo Z6 Pro हा एप्रिलमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HA1yx9

Comments

clue frame