२०, २५...नाही ३० सेकंद; मोबाइलच्या घंटीवरून वाद!

कोलकाता टेलिकॉम कंपन्यांमध्ये एक अजब वाद रंगलाय. आऊटगोइंग कॉलची रिंग ड्युरेशन काय हवी, यावर हा वाद चाललाय. एअरटेल आणि वोडाफोनसारख्या कंपन्यांचं म्हणणं आहे की आऊटगोइंग कॉलची घंटी कमीत कमी ३० सेकंद वाजली पाहिजे. जिओने आपल्या नेटवर्कमधून आऊटगोइंग कॉल्सची रिंग ड्युरेशन ५ सेकंद वाढवून २५ सेकंद केल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. ट्रायने कंपन्यांना याबाबत सहमतीने निर्णय घेण्यास सांगितले आहे. या घंटीमागेही मोठं अर्थकारण दडलेलं असतं. रिलायन्स जिओचा अंतरिम निर्णय मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने अलीकडेच जिओ नेटवर्कमधून जाणाऱ्या आऊटगोइंग कॉल्सची रिंग वाजण्याचा अवधी २० सेकंदावरून २५ सेकंद केला. या संबंधी टेलिकॉम नियामकांनी अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्वे जारी केली नाहीत, तोपर्यंत रिलायन्सने हा अंतरिम निर्णय घेतला आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने इकॉनॉमिक टाइम्सला दिली. एअरटेलचं ट्रायला पत्र एअरलेटने ट्रायला यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. एअरटेलला देखील आपल्या नेटवर्कमधून जाणाऱ्या कॉल्सचा रिंग टाइम घटवून रिलायन्सप्रमाणे २० सेकंदांचा करावा लागेल, असं एअरटेलनं या पत्रात म्हटलं आहे. जिओने रिंग ड्युरेशन वाढवायला हवी, असं आवाहन एअरटेलने ट्रायला केले आहे. जिओ मनमानी करत असल्याचा आरोपही एअरटेलने केला आहे. कॉल रिटर्नचा खेळ एअरटेलचं म्हणणं आहे की लहान रिंग अलर्टमुळे मिस्ड कॉल्सची संख्या वाढते. परिणामी जिओच्या नेटवर्कवर जास्त रिटर्न कॉल्स येतात. एअरटेलचा दावा आहे की अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओला आपला इंटरकनेक्शन युसेज चार्ज पेआऊट कमी करण्यास यामुळे मदत मिळते. दुसरीकडे जिओने हा आरोप फेटाळून लावत १५-२० सेकंदांची कॉल ड्युरेशन जागतिक मानांकनानुसार असल्याचा दावा केला आहे. ट्रायसोबत बैठक ६ सप्टेंबर रोजी ट्रायसोबत टेलिकॉम कंपन्यांची एक बैठक झाली होती. यात एअरटेल, वोडाफोन, बीएसएनएल आणि एमटीएनएलने भाग घेतला होता. यात कंपन्यांनी रिंग वाजण्याची किमान मर्यादा ३० सेकंद ठेवली जाण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. ही वेळ कंपनी आणि ग्राहक दोघांच्या हिताची असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं होतं. मात्र जिओला ही वेळ मर्यादा २० सेकंदांचीच हवी आहे. जिओचं म्हणणं आहे की कॉलचं उत्तर देण्यासाठी २० सेकंदांचा वेळ पुरेसा आहे. हा वेळ वाढला तर स्पेक्ट्रम रिसोर्स वाया जातात.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2miWw0P

Comments

clue frame