एअरटेलचा स्मार्ट सेट-टॉप बॉक्स; जिओला टक्कर?

नवी दिल्लीः भारतात रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनं मोबाईल कंपन्यांची झोप उडवली आहे. जिओमुळं अनेक कंपन्यानी त्यांचे मोबाइल प्लॅनचे दर कमी केले. आता जिओच्या गिगा फायबरमुळं पुन्हा एकदा मोबाईल कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. गिगा फायबरमध्ये हाय-स्पीड इंटरनेटबरोबरच ४के सेट-टॉप बॉक्स मिळणार आहे. जिओच्या गिगा फायबरला टक्कर देण्यासाठी एअरटेलनंही कंबर कसली आहे. एअरटेलही स्मार्ट सेट-टॉप बॉक्सची घोषणा करण्याची शक्यता आहे. एअरटेलनं २ सप्टेंबरला एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत कंपनी स्मार्ट सेट-टॉप बॉक्सची घोषणा करण्याची शक्यता आहे. एअरटेल जिओच्या सेट-टॉप बॉक्सपेक्षा अधिक चांगले फिचर देणार असल्याचं बोललं जात आहे. हाय स्पीड ब्रॉडबँड स्पीडदेण्यासाठी अँड्रोइडवर आधारित सेट-टॉप बॉक्स लाँच करणार आहे. सेट-टॉप बॉक्ससोबत एचडी टीव्ही फ्री जिओच्या वेलकम ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेल सेट-टॉप बॉक्ससोबत एचडी एलइडी टी.व्ही देणार असल्याची शक्यता आहे. एअरटेलनं चंदीगढ, मध्य-प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये इंटीग्रेटेड बिलिंग सुरू केलं आहे. पुढच्या महिन्यापासून पूर्ण देशभरात सुरू करणार आहे. एअरटेल त्यांचे एंटरटेनमेंट आणि ब्रॉडबँड टॅरिफ प्लॅन्स जिओ फायबरच्या लाँचिग दरम्यान जाहीर करणार असल्याचं सांगितलं. एअरटेल एंटरटेनमेंट आणि ब्रॉडबँड टॅरिफ प्लॅन्सची निवड केल्यानंतर प्रिमियम ग्राहकांना ओटीटी कॉन्टेंट, व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप्लीकेशन, एचडी टेलीव्हिजन वाहिन्या, अॅप्स, गेमिंग सर्व्हिसचा अॅक्सेस ग्राहकांना मिळणार आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32goXfd

Comments

clue frame