नवी दिल्लीः चीनची कंपनी (OnePlus) ने हा स्मार्टफोन () आणि वनपल्स टीव्ही () आज लाँच केले आहेत. वनपल्स ७टी या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर टीव्हीची किंमत ६९ हजार ९९० रुपये इतकी आहे. वन पल्स ७टीमध्ये दोन पर्याय देण्यात आले आहेत. ८ जीबी रॅम १२८ स्टोरेजच्या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम २५६ स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. वनपल्सच्या Q1 या टीव्हीची किंमत ६९ हजार ९०० रुपये तर Q1 Pro ची किंमत ९९ हजार ९०० रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा पल्स १२ आणि १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून या फोनमध्ये ३,८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याआधी कंपनीने वनपल्स ७ व ७ प्रो भारतात लाँच केला होता. कंपनीने लाँच केलेल्या वनपल्स ७ टीमध्ये दमदार प्रोसेसर, कॅमेरा आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. OnePlus 7Tची वैशिष्ट्ये >> ६.५५ फुल एचडी प्लस फ्लूयड एलईडी >> ट्रिपल कॅमेरा >> ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा >> १६ मेगापिक्सल अल्ट्रवाइड >>१२ मेगापिक्सल टेलेफोटो >> सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा >> क्वालक्वाम स्नॅपड्रॅगन ८५५ >> ३८०० एमएएच क्षमतेची बॅटरी
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ln3zVI
Comments
Post a Comment