नवी दिल्लीः स्मार्टफोन च्या लॉन्चिगला पुन्हा एकदा उशीर होणार आहे. हा फोन सप्टेंबर २०१९ ला बाजारात येणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आता हा फोन नोव्हेंबर नंतर बाजारात येणार आहे. वेगवेगळ्या स्मार्टफोनची क्रेझ सध्या लोकांमध्ये आहे. हीच गोष्ट लक्षात घेउन मोबाइल कंपन्या स्मार्टफोनमधे वेळोवेळी अफलातून बदल घडवून आणताना दिसून येतात. फोल्डेबल ही या फोनची खासियत आहे. हुवावे मेट X फोन ची खासियत ही आहे की हा फोन जोव्हा तुम्ही उघडता तेव्हा ८ इंच रॅपअराउंड OLED टॅबलेट डिस्प्ले सारखा दिसतो. आणि बंद केल्यानंतर याची स्क्रीन ६.६ इंच येवढी दिसते हे या फोनचे वेगळेपण आहे. ४० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस तसेच ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस कॅमेरा सुद्दा दिला आहे. या फोन मधे ५जी कनेक्टिविटीसाठी Balong 5000 5G Modem दिले आहे. यामुळे फुल्ल स्पीड नेटवर्कचा आनंद घेता येईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HaQ3fq
Comments
Post a Comment