Samsung Galaxy Tab A8 भारतात लाँच; किंमत आणि फीचर्स पाहा!

सॅमसंगने () भारतात लाँच केला आहे. टॅबसह दोन महिन्यांचा यूट्यूब प्रीमिअम ट्रायल पॅक मोफत मिळणार आहे. हा टॅब ओनली वाय-फाय आणि वायफाय+एलटीई (LTE) अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. टॅबमध्ये काळा आणि करडा रंग असे दोन पर्याय आहेत. दैनंदिन वापरासाठी हा एक कॉम्पॅक्ट डिव्हाइस आहे. टॅबमध्ये ५१०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. काय आहे किंमत? सॅमसंगच्या या टॅबच्या वाय-फाय व्हेरियंटची किंमत ९,९९९ रुपये, तर वाय-फाय+एलटीई व्हेरियंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. वाय-फाय व्हेरियंट प्री बुकिंगसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर वायफाय+ एलटीई व्हेरियंट या महिन्याच्या अखेरपर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाइन उपलब्ध होईल. फीचर्स सॅमसंग टॅबच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये किड्स होम मोड (Kids Home mode) प्रीलोडेड आहे. ते मोड चाइल्ड फ्रेंडली इटरफेससह उपलब्ध आहे. क्विक पॅनलच्या माध्यमातून ते एनेबल करता येऊ शकतं. या टॅबमध्ये फॅमिली शेअर फीचर सुद्धा देण्यात आलं आहे. मेटॅलिक डिझाइन असून, हा टॅब काळा आणि चंदेरी रंगात उपलब्ध आहे. या टॅबमध्ये अँड्रॉइड ९.० पाय ऑपरेटिंग सिस्टम आहे. ८ इंचाचा WXGA डिस्प्ले आहे. रिझॉल्यूशन १२८०x८०० मेगापिक्सल आहे. या टीएफटी डिस्प्लेचा आस्पेक्ट रेश्यो १६:१० असून, टॅबमध्ये २ जीबी रॅम आहे. ३२ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असून, ५१२ जीबीपर्यंत तो स्टोरेज वाढवता येऊ शकतो. टॅबमध्ये ८ मेगापिक्सल रिअर आणि २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M9L6aP

Comments

clue frame