नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीचा आजपासून सुरू झाला आहे. कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर एमआय डॉटकॉमवर १८ ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या ८ स्मार्टफोनवर ८ हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय एमआय ए २, शाओमी रेडमी वाय ३ आणि पोको एफ १ वर एमआय एक्सचेंज ऑफरमध्ये २००० रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. रेडमी नोट ७ प्रो रेडमी नोट ७ प्रो या ४जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १५,९९९ असून सेलमध्ये हा फोन १३, ९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन नेपच्यून ब्लू, स्पेस ब्लॅक आणि नेब्युला रेड रंगात उपलब्ध आहे. फोनमध्ये ४८ एमपी+ ५ एमपी रिअर कॅमेरा, ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि ४००० एमएएचची क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट ७ एस २००० रुपयांची सूट देण्यात आल्याने नोट ७ एस ९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. यात ६.३ इंचाचा डिस्प्ले, ४८ एमपी+ ५ एमपी रिअर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. रेडमी वाय ३ सेल्फी प्रेमींसाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला हा फोन सेलमध्ये ८,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. ही किंमत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज प्रकारातील फोनची आहे. फोनमध्ये ६.२६ इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ६३२ प्रोसेसर देण्यात आला आहे. पोको एफ १ एमआयच्या सुपर सेलमध्ये एफ १ हा फोन १७ हजार ९९९ या मूळ किंमतीत विकत घेता येणार आहे. सोबतच अन्य फोनच्या बदल्यात एक्सचेंज केल्यास या फोनवर २००० रुपयांची सूट मिळणार आहे. फोनमध्ये १२ एमपी + ५ एमपी रिअर, २० मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर दिला आहे. शाओमी एमआय ए२ एमआय ए २ चा ४ जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज प्रकारातील फोन ९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. सोबतच या फोनवर १००० रुपयांची एमआय एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. फोनमध्ये १२ एमपी + २० एमपी मेगापिक्सलचा ड्युएल आणि २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रेडमी नोट ७ रेडमी नोट ७ वर २ हजार ५०० रुपयांची सूट देण्यात आल्याने सेलमध्ये हा फोन ७ हजार ४९९ रुपयांना विकत घेता येईल. रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ६.२६ इंचाची मोठी स्क्रीन या फोनमध्ये समाविष्ट आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KIZXGa
Comments
Post a Comment