BSNLचा ९६ रुपयांत दररोज १०जीबी ४जी डेटा!

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड () आपल्या ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लान लाँच करत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त डेटाचे फायदेही मिळत आहेत. ज्या ठिकाणी कंपनीचे ४जी नेटवर्क आहे त्या परिसरात २ नवीन विशेष टेरिफ वाऊचर्स कंपनीने लाँच केले आहेत. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एसटीव्ही ९६चा प्लान लाँच केला आहे. याची वैधता २८ दिवस आहे. यात ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १०जीबी डेटा मिळणार आहे. ज्या ठिकाणी बीएसएनएलचे ४जी नेटवर्क अॅक्टिव्ह आहे, अशाच ठराविक ठिकाणांसाठी हा प्लान उपलब्ध आहे. बीएसएनएलचे ४जी नेटवर्क सध्यातरी फक्त महाराष्ट्रातील अकोला, बीड, जालना, उस्मानाबाद आणि आसपासच्या क्षेत्रात अॅक्टिव्ह आहे. खरं पाहता, या प्लानमध्ये फक्त डेटाचे फायदे आहेत, याशिवाय टॉकटॉइम एसएमएससारख्या सुविधांचा यात समावेश नाही. कंपनीने आपल्या ४जी ग्राहकांसाठी एसटीव्ही २३६ रुपयांचा प्लानही लाँच केला आहे. ज्यात ग्राहकांना ८४ दिवसांसाठी दररोज १०जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. कंपनीने आपल्या ४जी नेटवर्कच्या प्रसारासाठी हे दोन्ही प्लान लाँच केले आहेत. या प्लानच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बीएसएनएलचे ४जी नेटवर्क अॅक्टिव्ह आहे त्या ठिकणच्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा मानस आहे. यासोबतच बीएसएनएलने काही व्हॉइस बेस्ड एसटीव्हीजही लाँच केले आहेत. याद्वारे डेटा-बेस्ड एसटीव्हीज अधिकाधिक वाढवण्यावर कंपनीने लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होते. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफरही आणली आहे. ज्यात ग्राहकांना दररोजच्या सामान्य डेटा मर्यादेसोबतच २.२ जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Zj4SYJ

Comments

clue frame