BSNLने १,०९८ रुपयांचा प्रीपेड प्लान बदलला

नवी दिल्ली ः () ने आपला लोकप्रिय आता अपडेट केला आहे. बीएसएनएलच्या १,०९८ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनीने बदल केला आहे. कंपनीने हा प्लान २०१६ ला जिओच्या लाँचिंगवेळी आणला होता. विशेष म्हणजे बीएसएनएलचा हा पहिला प्रीपेड प्लान होता. ज्यात ८४ दिवसांची वैधता मिळत होती. जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने हा प्लान ग्राहकांसाठी आणला होता. या प्लानमध्ये पूर्णपणे अनलिमिटेड कॉलिंग मिळत होती. या प्लानमध्ये प्रतिदिन आउटगोइंग कॉलिंगला कोणतीही मर्यादा नाही. परंतु, कंपनीने या प्लानची वैधता कमी केली आहे. याआधी ८४ दिवस वैधता होती. परंतु, ती आता ७५ दिवस इतकी करण्यात आली आहे. या प्लानमध्ये एकूण ३७५ जीबी डेटा मिळणार आहे. डेटा ग्राहक ७५ दिवस चावलणार की एका दिवसात संपून टाकणार हे ग्राहकांवर अवलंबून आहे. बीएसएनएलने अनलिमिटेड कॉलिंग सुविधा बंद केली आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर ग्राहक आता केवळ एका दिवसात २५० मिनिटे कॉलिंग करू शकतात. त्यानंतर केलेल्या कॉलिंगला शुल्क लागणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TTGw1P

Comments

clue frame