नवी दिल्लीः जगभरातील 'अॅपल'प्रेमींना प्रतिक्षा असते ती आयफोनच्या नव्या मॉडेलची. आता लवकरच युजर्सची प्रतिक्षा संपणार आहे. सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीनं यावर्षीच्या कार्यक्रमासाठी मीडियाला निमंत्रण पाठवण्यास सुरूवात केली आहे. १० सप्टेंबरला स्टीव्ह जॉब्स थेटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात 'आयफोन ११'ची घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येतंय. तीन आयफोन लाँच होण्याची शक्यता 'आयफोन ११'च्या फिचर्सबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. तसंच आयफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहितीही लीक झाली आहे. अॅपलच्या या कार्यक्रमात तीन नवीन आयफोन्ससोबत 'अॅपल वॉच ४'चं अपग्रेड व्हर्जन लाँच होणार आहे. त्याचबरोबर, 'आयफोन एक्सएस', 'आयफोन एक्सएस मॅक्स' आणि 'आयफोन एक्सआर' (अपग्रेड व्हर्जन) लाँच करणार आहे. ट्रिपल रिअर कॅमेरासह येणार नवीन आयफोन 'आयफोन ११ एक्स मॅक्स' आणि 'आयफोन एक्सएक्स'मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. तसंच 'आयफोन एक्सआर'च्या अपग्रेटेड व्हर्जनमध्ये ड्यूएल कॅमेरा असेल. बॅटरीची क्षमता 'आयफोन ११'मध्ये 'ए१३' प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. आयफोनच्या आधीच्या डिव्हाइसपेक्षा नव्या डिव्हाइसमध्ये बॅटरीची क्षमता जास्त असेल. 'आयफोन एक्सएस' आणि 'एक्सएस मॅक्स'मध्ये ओएलइडी डिस्प्ले आणि 'आयफोन एक्सआर'मध्ये एलसीडी डिस्प्ले देण्यात येणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2La32Rf
Comments
Post a Comment