सावधान! 'या' अॅप्सचा वापर करून होत आहे पैशांची चोरी

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत मदतशीर असणाऱ्या 'एनी डेस्क' आणि 'टीम व्हयूअर' अॅप्सचा वापर करून मोठ्या प्रमाणात होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या तिन्ही बँकांनी अशा चोऱ्यांविरोधात अॅलर्ट जाहीर केला आहे. अॅपच्या माध्यमातून दुसऱ्या एखाद्या मोबाइलवरून तुमच्या मोबाइलमधील सेटिंग्स, अॅप पाहता येतात. तसंच त्यांच्यामध्येही बदल करता येतात. म्हणूनच पैसे चोरण्यासाठी या अॅप्सचा वापर केला जातो. पैसे चोरण्यासाठी हे ठग फोन करतात. बँक कर्मचारी असल्याचं सांगत सर्वप्रथम एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. हे अॅप डाऊनलोड केल्यावर स्क्रीन शेअरिंगसाठी एक नऊ आकडी पास कोड मोबाईलवर येतो. तो पास कोड सांगितल्याशिवाय आपल्या मोबाइलचा अॅक्सेस या ठगांना मिळत नाही. पण काहीतरी कारण देत हा कोड सांगण्यास हे ठग भाग पाडतात. एकदा त्यांना कोड मिळाला की त्यांना मोबाइलच्या सर्व सेटिंग्सचा अॅक्सेस मिळतो. फोन लॉक केला तरी हे अॅप बॅकग्राऊन्डवर काम करत राहतं. ज्याक्षणी युजर एखादा बँकव्यवहार करतो त्याक्षणी त्याचे युजरनेम, पासवर्ड युपीआय कोड अशा गोष्टी टिपल्या जातात. नंतर त्याच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम लुटली जाते. एनीडेस्क अॅपचा वापर करून होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण अॅण्ड्रॉइड युजर्समध्ये अधिक आहे. आयफोन या अॅपला सहजासहजी स्क्रीनचा अॅक्सेस देत नाही. हे अॅप डाऊनलोड करण्याआधीच ते कसे काम करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. याशिवाय टीम व्ह्यूअर अॅपच्या मदतीनेही पैशांची चोरी केली जात आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OWncSv

Comments

clue frame