नवी दिल्लीः स्वीडन यूट्यूबर हा १०० दशलक्ष सबस्क्राइबर्सचा आकडा पार करणारा जगातील पहिला यूट्यूबर ठरला आहे. या आधी भारतीय यूट्यूब चॅनल टी-सिरीजने हा आकडा पार केला होता. प्यूडिपाई हा गेल्या दोन वर्षापासून सगळ्यात जास्त कमाई करणारा यूट्यूबर बनला आहे. २९ वर्षीय प्यूडिपाईने मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करताना यूट्यूबने त्याचा अत्तापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. स्वीडनचे नागरिकत्व असणारा प्यूडिपाईने खूपच कमी वयात लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. असे असताना प्यूडिपाई नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. परंतु याचा कणभरही परिणाम त्याच्या लोकप्रियतेवर झालेला दिसत नाही. काही दिवसांपूर्वी 'सब्सक्राईब टू प्यूडिपाई' ही मोहीम त्याच्या चाहत्यांनी प्यूडिपाईसाठी राबवली होती. यावरूनच चाहत्यांचे त्याच्यावर असणारे प्रेम दिसून येते.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/320tLoE
Comments
Post a Comment