सीएमओ आशियाचे 'जिओ'ला ५ पुरस्कार

नवी दिल्ली ः टेलिकॉम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिओला प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या सीएमओ आशिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात जिओने तब्बल ५ पुरस्कार पटकावले आहेत. टेलिकॉम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ समजले जाणारे तीन तर डिजिटल मार्केटिंगचे दोन अशा पाच पुरस्कारासह जिओला टेलिकॉम क्षेत्रात सर्वाधिक पुरस्कार पटकावण्याचा मान मिळाला आहे. डिजिटलमध्ये सर्वोत्कृष्ठ एलटीई सर्व्हिस प्रोव्हाईडरचा पुरस्कार जिओने पटकावला आहे. भारताचा स्मार्टफोनचा पुरस्कारही जिओने पटकावला आहे. 'हँडसेट इनोव्हेशन ऑफ द ईअर' हा पुरस्कार जिओला मिळाला आहे. कुंभ मेळादरम्यान जिओने टेलिकॉम प्रोजेक्ट राबवून जनजागृतीचे काम हाती घेतले होते. जिओच्या या जनजागृतीचा कोट्यवधी लोकांना फायदा पोहोचला होता. डिजिटल मार्केटिंगमधील लिडरशीपचा पुरस्कारही जिओला मिळाला आहे. मनोरंजन अॅप्समधील गटात जिओसावन (JioSaavn) अॅप्सला (संगीत) आणि टीव्हीला (मनोरंजन) हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. सीएमओ आशिया २०१० साली लाँच करण्यात आली आहे. मार्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या स्टोरिज शेअर करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे काम सीएमओ आशिया करते. मार्केटिंग स्पेस आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम सीएमओ करतेय. सीएमओ आशियाच्या पुरस्काराचे हे १० वे वर्ष आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zh6nH9

Comments

clue frame