इन्स्टाग्रामचं 'हे' फिचर व्हॉट्सअॅपमध्ये येणार

मुंबईः मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये अव्वल असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सतत नवीन फिचर अपडेट केले जातात. आता पुन्हा काही फिचर्स आणणार असल्याचं समजतंय. या फिचरमुळं युजर्सना इन्स्टाग्रामप्रमाणे बुमरँग व्हिडिओ करता येणार आहेत. आणि व्हॉट्सअॅप हे दोन्ही फेसबुकच्या मालकीचे आहेत. इन्स्टाग्राममधील तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे आणि हेच लक्षात घेत व्हॉट्सअॅपनं फिचर अपटेड करण्याचं ठरवलं आहे. या फिचरच्या मदतीनं व्हॉट्सअॅप युजर्स बुमरँग व्हिडिओ तयार करून मित्र, नातेवाईंकासोबत शेअर करु शकतात. तसंच व्हिडिओ आणि फोटोंप्रमाणे बुमरँग व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसमध्येही ठेवता येणार आहे. व्हॉट्सअॅपनं काही महिन्यांपूर्वी लाँच केलेल्या फिचरमुळं युजर्स ७ सेकंदाच्या व्हिडिओचं जीआयएफमध्ये रुपांतर करु शकतात. याचप्रकारे ७ सेकंदाचा व्हिडिओ बुमरँग करता येणार आहे. यासाठी व्हिडिओच्या एडिटमध्ये पर्याय उपलब्ध असणार आहे. व्हॉट्सअॅपचं हे नवं फिचर सर्वात पहिले आयओएस स्मार्टफोनमध्ये दिसणार आहे. त्यानंतर अँड्रोइड युजर्ससाठी हे फिचर अपडेट केलं जाईलं. अद्याप व्हॉट्सअॅपनं हे फिचर कधी लाँच होणार याबाबत घोषणा केली नाहीये. बुमरँग फिचरबरोबरच व्हॉट्सअॅप आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळं व्हॉट्सअॅप अकाउंटचा अॅक्सेस एकापेक्षा अनेक डिव्हाइसवर मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZKW0XX

Comments

clue frame