मोबाइल फेस्टः आसूस स्मार्टफोन्सवर ५ हजारांपर्यंत सूट

नवी दिल्लीः फ्लिपकार्टच्या 'मंथ एंड मोबाइल फेस्ट'मध्ये स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. या मोबाइल फेस्टमध्ये आसूस स्मार्टफोन्सवर तब्बल ५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टचा मंथ एंड सेल २६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान सुरू राहणार आहे. मोठी सूट आणि बेस्ट डीलसह नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही ग्राहकांना मोबाइल खरेदी करताना मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आसूस स्मार्टफोनवर दिल्या जाणाऱ्या आकर्षक सूटबद्दल.... आसूस 6Z आसूसचा हा स्मार्टफोन ३००० रूपयांच्या एक्सचेंज बोनसवर खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेरासोबतच ड्युअल एलइडी फ्लॅश आणि ६ जीबी रॅम देण्यात आलाय. झेनफोन 5Z या फोनवर ५ हजार रूपयांची सूट देण्यात आलीय. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत २८,९९९ रूपये इतकी आहे. मात्र, ५ हजार रुपयांच्या सूटनंतर याची किंमत २३,९९९ रुपये इतकी होईल. झेनफोन मॅक्स प्रो M1 पाचशे रूपयांच्या सूटनंतर या मोबाइलची किंमत ८,४९९ रूपये होणार आहे. यामध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज आहे. तसेच ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत ७,४९९ रुपये इतकी आहे. झेनफोन मॅक्स M1 या फोनमधे ३ जीबी रॅम +३२ जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनवरही पाचशे रूपयांची सूट दिलेली आहे. या फोनची किंमत ६,९९९ रूपये इतकी आहे. सूटनंतर ही किंमत ६,४९९ इतकी होईल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U1gObC

Comments

clue frame