कार्बनचे ४ फोन लाँच; किंमत फक्त ७०० रुपये

नवी दिल्लीः फीचर फोन बनवणारी प्रसिद्ध कंपनी कार्बनने भारतीय बाजारात केएक्स (KX) सीरिजचे ४ नवीन फोन लाँच केले आहेत. , , आणि अशी चार फोनची नावे आहेत. या चारही फोनची किंमत खिशाला परवडणारी आहे. ७०० रुपये ते १ हजार रुपयांच्या आत ग्राहकांना हे फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. महिन्याभरात हे चारही फोन विक्रीसाठी भारतीय बाजारात उपलब्ध होतील. कार्बन केएक्स ३ (Karbonn KX३) फोनमध्ये ४.५ इंचाचा डिस्प्ले, डिजिट रिड-आऊट आणि व्हिडिओ म्युझिक प्लेअर देण्यात आला आहे. ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून यात पॉवर आणि सेविंग मोड सुद्धा देण्यात आला आहे. या फोनमध्ये रेकॉर्डरसोबतच वायरलेस एफएम आणि बूम बॉक्स स्पीकर देण्यात आला आहे. कार्बन KX25 फोनमध्ये ६.१ सेंटीमीटरचा डिस्प्ले आणि सुपर ब्राइट ४ एलईडी टॉर्चसोबत देण्यात आला आहे. यात १८०० एमएएच क्षमतेची बॅटरी सोबतच एफएम रेडिओ, डिजिटल कॅमेरा आणि ड्युअल सीमकार्डची सुविधा आहे. कार्बन केएक्स २६ फोनमध्ये ६.१ सेंटीमीटरचा डिस्प्ले, डिजिटल कॅमेरा, १४५० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. केएक्स २७ या फोनमध्ये बॅटरी बॅक अप सर्वात जास्त आहे. १७५० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून फोनमध्ये डिजिटल कॅमेरा, ब्लूटूथ, व्हिडिओ, म्युझिक प्लेअर, रेकॉर्डरसह वायरलेस एफएम रेडिओ आणि पॉवर सेविंग मोड देण्यात आला आहे. या सर्व फोनची किंमत ७०० रुपये ते १००० रुपये दरम्यान आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MJqXYT

Comments

clue frame