ओप्पोच्या 'रेनो २' मध्ये ४ कॅमेरे; आज होणार लाँच

मुंबईः चीनची कंपनी ओप्पोने आपली 'रेनो २' स्मार्टफोन सीरिज भारतात आज लाँच करणार आहे. स्मार्टफोन लाँच होण्याच्या आधीच कंपनीनं प्रदर्शित केलेल्या टीझरमुळं स्मार्टफोनविषयी युजर्सची उत्सुकता वाढली आहे. 'ओप्पो रेनो २'मध्येही शार्क फिन रायजिंग सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 'ओप्पो रेनो २'चा लाँच सोहळा आज दुपारी ३ वाजता सुरू होणार असून कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह पाहता येणार आहे. सोहळ्यात या सीरीजमधील 'ओप्पो रेनो २झेड' आणि 'ओप्पो रेनो २एफ' हे दोन स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीनं मात्र अद्याप फोनची किंमत गुलदस्त्यात ठेवली आहे. 'ओप्पो रेनो २' दोन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसरचा पॉवर्ड राहणार आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये ४,०६५ एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या पाठीमागे ४ कॅमेरे देण्यात आले असून १३, ८ आणि २ मेगापिक्सल सेंसर देण्यात आले आहेत, तर, १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NwcZKi

Comments

clue frame