एलजीचा तीन स्क्रीनवाला स्मार्टफोन येतोय

मुंबईः एलजी कंपनीनं त्यांच्या आगामी डिव्हाइसचा टीजर लाँच केला आहे. या टीजरमध्ये एका डिव्हाइसला तीन स्क्रीन असल्याचं दिसत आहे. टीझरमध्ये अॅनिमेटेड सिंगल स्क्रीनवर व्हिडिओ गेम सुरू आहे. तितक्यात दुसरी स्क्रीन सुरू होऊन एक मॅप ओपन झाला आहे. त्यानंतर हा डिव्हाइस बंद होऊन तिसऱ्या छोट्या स्क्रीनवर दिनांक दिसत आहे. अॅक्सेसरी असण्याची शक्यता एलजीच्या या डिव्हाइसचा टीजर लाँच झाल्यानंतर युजर्समध्ये या डिव्हाइसविषयी प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणताही माहिती कंपनीनं जाहीर केली नाहीये. एलजीचा 'व्हि५० थिंकक्यू'च्या दोन स्क्रीन असलेल्या अॅक्सेसरीसोबत मिळताजुळता असा हा डिव्हाइस आहे. त्यामुळं कदाचित एलजीचे हे डिव्हाइस फोन अॅक्ससरी असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. फोल्डेबल नसणार स्क्रीन या डिव्हाइसची स्क्रीन सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड किंवा हुवाई मॅट एक्सप्रमाणे मध्येच दुमडणारी नसेल. या डिव्हाइसला दोन वेगवेगळ्या स्क्रीन असण्याची शक्यता आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YPk3rm

Comments

clue frame