नवी दिल्ली: जगभरातील यूजरची खासगी माहिती उघड होणे किंवा डेटा चोरी होण्याचे प्रकार वाढत असल्यानं सरकारच नव्हे, तर खासगी यंत्रणाही चिंतेत आहेत. डेटा सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत असतानाच, काही दिवसांपूर्वी लाखो यूजरचे फिंगरप्रिंट्स लीक झाले होते आणि आता एका प्रसिद्ध पॉर्न साइटने यूजरचा खासगी डेटा शेअर केला असल्याचं समोर आलं आहे. 'द नेक्स्ट वेब'च्या रिपोर्टनुसार, लुसियस (Luscious) या पॉर्न साइटवर अलीकडेच संशयास्पद बाबी आढळून आल्या. या वेबसाइटनं यूजरची ओळख लपवून त्यांना अश्लिल फोटो आणि अॅनिमेशन अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. साइटमध्ये उणिवा असल्याचं व्हीपीएन मेंटॉरच्या रिसर्च टीमनं लक्षात आणून दिलं. या उणिवांमुळं साइटवरील अडल्ट कॉन्टेन्ट अपलोड करणाऱ्या किंवा पाहणाऱ्या लाखो यूजरशी संबंधित वैयक्तिक माहिती मिळवण्यात रिसर्च टीम यशस्वी झाली. लीक झालेल्या डेटामध्ये यूजरचे ईमेल, जेंडर आणि ते कोणत्या देशातील आहेत यासंबंधी माहिती आहे. इतकंच नाही तर डेटा असुरक्षित आणि अनएनक्रिप्टेड असल्यामुळे यूजरच्या कॉमेंट्स, लाइक्स, अपलोड्स आणि ब्लॉग पोस्ट आदींचा अॅक्सेस मिळवला आहे. रिसर्च टीमच्या म्हणण्यानुसार, झाल्यामुळं यूजरच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ईमेल आणि देश आदी माहिती मिळाल्यानं फिशिंग, डॉक्सिंग आदींमध्ये ते ओढले जाऊ शकतात. यूजरच्या ऑनसाइट अॅक्टिव्हिटीमुळं त्यांना धमकावले जाऊ शकते. लुसियसच्या टीमला या 'बग' संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यावर उपाय करून पॅच रिलीज केला आहे. दरम्यान, याबाबत लुसियसकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33LUaIK
Comments
Post a Comment