प्लेस्टोअरमधील 'हे' अॅप धोकादायक, लगेच डिलीट करा

नवी दिल्ली: गुगल प्लेस्टोअरमधून मोठ्या प्रमाणात लोकं अॅप डाऊनलोड करत असतात. पण याच प्ले स्टोअरमधील ३३ लोकप्रिय अॅप्समध्ये धोकादायक मालवेअर घुसलं असून ते इन्स्टॉल केल्यास मोबाइलमध्ये व्हायरस शिरू शकतं. यापैकी काही अॅप्सविषयी जाणून घेऊया. दररोज वापरातील अॅप दररोज वापराती अनेक अॅपना या मालवेअरची लागण झाली आहे. जीपीएस फिक्सर हा असाच एक लोकेशन डिटेक्टर अॅप आहे. यालाही मालवेअरची लागण झाली आहे. तसंच क्यूआर कोड रिडर, क्यू आर कोड बार कोड स्कॅनर , फ्री इमोजी कीबोर्ड स्कॅनर अशा अॅप्सला मालवेअरची लागण झाली आहे. एक्सपर्ट्स सल्ला देतात की या अॅपला डाऊनलोड करू नये. डिक्शनरी आणि फिटनेस अॅप जगभर अशा युजर्सची संख्या खूप जास्त आहे जे स्मार्टफोनमध्ये डिक्शनरी अॅप ठेवतात. काही वेळा हे अॅप खूप मदतशीर ठरतात. एका संशोधनानुसार इंग्लिश टू उर्दू ऑफलाइन डिक्शनरी अॅपला मालवेअरची लागण झाली आहे. तसंच पेडोमीटर स्टेप कंटर अॅपही सुरक्षित नाही. हे अॅप मोबाइलमध्ये असल्यास लगेच डिलीट करा. रुट फाइंडर अॅपही धोकादायक रस्ते शोधण्यासाठी सामान्यत: लोक गुगल मॅप्सचा वापर करतात.पण गुगल अॅप्स प्रमाणे रुट फाइंडर अॅपचाही वापर केला जातो. हे अॅप जर तुमच्या मोबाइलमध्ये असेल तर तुम्ही लगेच डिलीट करू शकता. याशिवाय जीपीएस स्पीडोमीटर आण जीपीएस स्पीडोमीटर प्रो हे लोकप्रिय अॅपही धोकादायक ठरत आहेत. डॉक्युमेंट रीडर अॅपपीडीएफ व्ह्यूअर, नोटपॅड , टेक्स्ट रीडर, ई लोकप्रिय अॅप्समध्येही मालवेअर घुसले आहेत. हे अॅप तुमच्या मोबाइलमध्ये असल्यास लगेच डिलीट करा. सोशल मीडिया अॅपमध्येही मालवेअर हू अनफ्रेन्डेड मी , हू डिलीटेड मी सारखे फेसबुकशी संबंधित सोशल मीडिया अॅपवरही या मालवेअरचा हल्ला झाला आहे. त्यामुळे फेसबुकशी संबंधित हे अॅप इन्स्टॉल केले नाही तरच बरं होईल. धार्मिक अॅपही सुरक्षित नाहीत प्ले स्टोअरवर धार्मिक अॅपची संख्या भरपूर वाढली आहे. यापैकी मुस्लिम प्रेयर ,किबाला कंपास,प्रेयर टाइम्स सारखे जगप्रसिद्ध अॅप्समध्ये मालवेअर घुसरं आहे. तेव्हा धार्मिक लोकांनी या अॅप्सपासून दूरच राहावं 'हे' अॅप्सही सुरक्षित नाही वर सांगितलेल्या अॅप्सशिवाय ओके गुगल व्हॉइस कमांड्स, १३०० मॅथ फॉर्म्युला मेगा पॅक, जीपीएस रुट फाइंडर ,सोशल सायंस ,बॉम्बबुज आयआरसीटीसी सारखे अॅपही धोकादायक झाले आहेत त्यामुळे वरील कोणतेही अॅप्स असतील तर तुमच्या मोबाइलमधून डिलीट करा.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HaRz15

Comments

clue frame