फेसबुकवर चित्रपटाची तिकीटं बुक करता येणार

नवी दिल्ली: फेसबुकवर आता चित्रपटांचे शो टाइम्सही पाहता येणार आहेत. त्याची तिकीटंही बुक करता येणार आहेत. तसंच एखादा चित्रपटाचा ट्रेलर आवडल्यास तो प्रदर्शित झाल्यावर तो चित्रपट पाहण्याचं रिमाइंडर देणारं नोटिफीकेशन मिळणार आहेत. हे दोन्ही फिचर्स फेसबुकने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लॉंच केले असून लवकरच भारतातही लॉंच करण्यात येणार आहेत. आतापर्यंत फेसबुकवर चित्रपटांच्या जाहिराती, ट्रेलर्स पाहता येत होते. आता मात्र विविध थिएटरमधील त्या चित्रपटांच्या वेळाही पाहता येणार आहेत. एखाद्या चित्रपटाच्या जाहिरातीवर क्लिक करून गेट शोटाइम्स ऑप्शन निवडल्यावर तो कोणत्या थिएटरमध्ये चालू आहे, शो-टाइमिंग्स काय आहेत ही सगळी माहिती जाणून घेता येणार आहे. तसंच चित्रपटाची तिकीटंही बुक करता येणार आहेत. तसंच एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर आवडल्यास त्याच्या जाहिरातीवर क्लिक करून 'इन्ट्रेस्टेड' मार्क करता येईल. असं केल्यावर तो चित्रपट प्रदर्शित झाला की लगेच युजर्सला नोटिफीकेशन देणार आहे. तेव्हा भारतात हा फिचर कधी लॉंच होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YMfBum

Comments

clue frame