नवी दिल्लीः रिलायन्स उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ फायबरची घोषणा केली. त्याचबरोबर जिओ स्मार्ट सेट-अपबॉक्सचीही माहिती त्यांनी दिली. हायब्रिड मॉडेल असलेल्या जिओ सेट-टॉप बॉक्सद्वारे ब्रॉडबँड कनेक्शनसह टीव्ही व अन्य सुविधा देखील ग्राहकांना मिळणार आहेत. या सेट टॉप बॉक्सचा पहिला फोटो समोर आला आहे. 'ड्रिम डीटूएच'नं या सेट टॉप बॉक्सचा पहिला फोटो शेअर केला आहे. जांभळ्या रंगाच्या सेट टॉप बॉक्समध्ये कनेक्टिव्हीटीसाठी पॉवर सॉकेट देण्यात आलं आहे. तसंच, एमएसओसाठी कोक्सिएल केबल पोर्ट, टी.व्हीला कनेक्ट करण्यासाठी एचडीअमआय पोर्ट, जिओ फायबर राउटरला कनेक्ट करण्यासाठी इंटरनेट आरजे४५ पोर्ट आणि यूएसबी २.० , यूएसबी ३ पोर्ट असे पर्याय देण्यात आले आहेत. सेट-टॉप बॉक्ससोबत रिमोट सेट टॉप बॉक्ससोबत त्याचा रिमोटचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.. जिओ सेट-टॉप बॉक्सचा लूक टाटा स्काय सेट-टॉप बॉक्सशी मिळता जुळता आहे. त्याचबरोबर यात व्हॉइस सर्च फिचरदेखील देण्यात आलं आहे. ज्यामुळं ओटीटी प्लॅटफॉर्मच्या साहाय्यानं युजर्स व्हॉइस कमांड देऊन चॅनेल बदलू शकतात. सेट-टॉप बॉक्स आणि टी.व्हीसाठी एकच रिमोट देण्यात आला आहे. फ्रीमध्ये मिळणार सेट-टॉप बॉक्स रिलायन्स ५ सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. जिओ गिगा फायबर कनेक्शनसोबत सेट-टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34dlBv0
Comments
Post a Comment