मस्तच! सेल्फी व्हिडिओ सांगणार तुमचा 'बीपी'

नवी दिल्लीः सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी तसेच डिस्प्ले पिक्चर (डीपी) बदलण्यासाठी अनेकदा सेल्फी काढला जातो. परंतु, आता सेल्फीतून ब्लड प्रेशर () किती आहे हे कळणार आहे. कॅनडामधील टोरंटो विद्यापीठातील एका संशोधकाने हा दावा केला आहे. सेल्फी व्हिडिओतून ब्लड प्रेशर कळू शकतो, असं त्याचं म्हणनं आहे. कॅनडामधील १,३२८ लोकांवर यासंबंधी संशोधन करण्यात आले आहे. संशोधनादरम्यान ९६ टक्के लोकांचा बीपी समजण्यात मदत झाली आहे. या चाचणीत ३ वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड प्रेशर समोर आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिलीय. शास्त्रज्ञाने ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे चेहऱ्यावरील स्कीनमधून ब्लड प्रेशरची माहिती मिळू शकते. संशोधनावेळी २ मिनिटांच्या सेल्फी व्हिडिओचा वापर करण्यात आला होता. ज्यावेळी सेल्फी व्हिडिओ बनवला जातो. त्यावेळी मोबाइलमधील कॅमेऱ्यातील ऑप्टीकल सेन्सर चेहऱ्यावर पडणाऱ्या लाल किरणाला रेकॉर्ड करतेय. लाल किरण त्चचेच्या खाली हिमोग्लोबिनमुळे रिफ्लेक्ट होते. याच किरणातून शरीरातील ब्लड प्रेशरची माहिती समजण्यात मदत होते. यासाठी न्यूरोलॉजिक्स नावाच्या कंपनीने एनुरा हे अॅप सुद्धा लाँच केला आहे. हे अॅप ३० मिनिटांच्या सेल्फी व्हिडिओतून छातीतील श्वास आणि तणावाची स्थितीची माहिती देते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2yXpTIU

Comments

clue frame