मुंबईः युजर्ससाठी ऑगमेंटेड रिएलिटी वॉकिंग डायरेक्शन हे नवं फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या फिचरमुळं युजर्सना स्ट्रीट व्ह्यू उपलब्ध होणार असून यामुळं रस्ता शोधणं अधिक सोपं होणार आहे. गुगल पिक्सल आणि गुगल मॅप्स गाइड्ससाठी हे फिचर अल्फा मोडमध्ये सुरू होतं. आता कंपनीनं आयओएस आणि 'एआर' सपोर्ट असलेल्या अँड्रोइड स्मार्टफोनवर फिचर उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यात हे फिचर सर्व स्मार्टफोनवर अपडेट होण्याची शक्यता आहे. थ्रीडी अॅरो मॅप मॅपवर लोकेशन सुरू केल्यानंतर त्यावर टॅप करा आणि डिरेक्शन बटणवर क्लिक केल्यानंतर वॉकिंग असा पर्याय येईल. त्यानंतर स्क्रीनच्या खाली असलणाऱ्या लाइव्ह व्ह्यूवर टॅप करा. लाइव्ह व्ह्यूवर टॅप करताच स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू होईल. लोकेशन सुरू झाल्यानंतर स्मार्टफोन तुमच्या समोर राहील याची काळजी घ्या. रस्त्यांवर चालताना कोणत्या ठिकाणी थांबायचंय व कोणत्या दिशेनं वळायचं हे सांगणार आहे. कॅमेरा सुरू असल्यानं तुमच्या आजुबाजूचा परिसरची गुगलला माहिती मिळणार आहे. त्यानुसारचं गुगल तुम्हाला रस्ता सांगणार आहे. आणखी एक नवं फिचर या अपडेट बरोबरच गुगल मॅप अन्य फिचर्स अपग्रेट करत आहे. रिजर्व्हेशन टॅब हे त्यातीलच एक फिचर. या फिचरच्या मदतीनं फ्लाइट्स आणि हॉटेलची महत्त्वाची माहिती यात तुम्ही सेव्ह करू शकता. विशेष म्हणजे ही माहिती तुम्ही ऑफलाइनही पाहू शकणार आहात. गुगल मॅप पुढच्या काही दिवसांत हे फिचर्स युजर्सपर्यंत पोहचवणार आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z3WE1G
Comments
Post a Comment