जुन्या स्मार्टफोनला बनवा घरचा 'सेक्युरिटी कॅमेरा'

: आपल्या जवळ एखादा जुना अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन धूळ खात पडला असेल, त्या स्मार्टफोनला चांगली किंमत मिळत नसल्याने तुम्ही विकला नसेल. तर तुम्ही या स्मार्टफोनचा चांगला वापर करू शकता. मागच्या काही वर्षात स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा, जास्त स्टोरेज आणि अधिक क्षमता असणाऱ्या बॅटरी लाइफबरोबर येत आहे. आजकाल सुरक्षेच्या दृष्टीने 'सेक्युरिटी कॅमेरा' खूप गरजेचा आहे. मात्र, त्याची किंमत जास्त असल्याने आणि मेंटनेंस महाग असल्याने लवकर कोणी विकत घेत नाही. अशावेळी जुन्या स्मार्टफोनला बनवला जाऊ शकतो. जुन्या अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनला घरी सेक्युरिटी कॅमेरा वाय-फाय किंवा कमीत कमी ४जी कनेक्शनची गरज आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनची चार्जिंग लवकर संपू नये, म्हणून पॉवर बँकचीही आवश्यकता आहे. स्मार्टफोन सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये,यासाठी जुन्या स्मार्टफोनला फॅक्ट्री रिसेट करावा लागणार आहे. तसेच गुगल प्ले-स्टोरवर जाऊन अल्फ्रेड कॅमेरा अॅप उपलब्ध आहे. हा अॅप इन्स्टॉल आणि रजिस्टर करावा लागेल. दुसऱ्या स्मार्टफोनवर पाहा लाइव्ह फीड अॅप सेटअप करताना 'i use this device as' हा प्रश्न आल्यावर, तर कॅमेरा हा पर्याय निवडा. त्यानंतर गुगल अकाउंटच्या मदतीने लॉग-इन करावे लागेल. आपल्या पर्यायी अकाउंटवर लॉग-इन केल्यानंतर आपला स्मार्टफोन हा सेक्युरिटी कॅमेरावर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरुवात होईल. तसेच दुसऱ्या एका स्मार्टफोनवर अॅप डाउनलोड करावा लागेल. हा अॅप सेटअप करताना 'i use this device as' हा प्रश्न आल्यावर, व्हिव्हर हा पर्याय निवडा आणि त्याच गुगल अकाउंटवरुन लॉग-इन करा. त्यानंतर तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या कॅमराची लाइव्ह फीड पाहू शकता. घ्यावे लागेल अॅपचे सब्सक्रिप्शन या अॅप्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. एका वर्षाचे अफ्रेड अॅप्सचे सब्सक्रिप्शनसाठी १७८ रुपये मोजावे लागतात.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31En0ca

Comments

clue frame