नवी दिल्लीः फ्लिपकार्टने स्वातंत्र्य दिनाच्या सेलनंतर पुन्हा एकदा गॅझेट ग्रांड डेज सेल सुरू केला आहे. २७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेला हा सेल २९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर ८० टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे, असा दावा फ्लिपकार्टकडून करण्यात येत आहे. या सेलमध्ये आसुस आणि अॅसेर यासारख्या कंपन्यांच्या प्रोटेबल आणि स्लीम लॅपटॉप ३३ हजार ९९० रुपयांना तर आय ५ लॅपटॉपवर कमीत कमी १० टक्के सवलत दिली जात आहे. आसुसचा विवो बुक कोर आय ३ सातव्या जनरेशनचा लॅपटॉप ३३ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. आसुससह अन्य कंपन्यांचे गेमिंग लॅपटॉप ४९ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. स्वस्तातील लॅपटॉप हवा असेल तर अॅसेरचा अॅस्पाएर ३ पेंटियम गोल्ड हा केवळ १८ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. यात १ टीबी एचडीडी आहे. तर अॅपलच्या मॅकबुकची सुरुवातीची किंमत ६७ हजार ९९० रुपये इतकी आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अल्काटेलचा १टी७ वाय-फाय व्हर्जन ३ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. मायक्रोसॉफ्टचा सरफेस गो २९ हजार ९९९ रुपयांना आणि ऑनरचा ऑनर पॅड ५ हा १७ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NBoArA
Comments
Post a Comment