लाँच होण्याआधीच शाओमी 'एमआय ए३'चा टीजर लीक

मुंबईः चीनी कंपनी शाओमी लवकरच भारतात 'एमआय ए३' स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मागच्या वर्षी लाँच झालेला 'एमआय ए२'चं हे अपग्रेडेट व्हर्जन आहे. शाओमी 'एमआय ए३' भारतात २१ ऑगस्टला लाँच होत असतानाच अॅमेझॉननं वेबसाइटवर 'एमआय ए३'चा टीजर लाँच केला आहे. शाओमीनं याआधीच 'एमआय ए३' २१ ऑगस्टला भारतात लाँच करणार असल्याचं जाहीर केलं होतं. अॅमेझॉननं मात्र, लाँच होण्याआधीच त्यांच्या वेबसाइटवर 'एमआय ए३'चा टीजर लाँच केला आहे. असं असलं तरी ई-कॉमर्स वेबसाइटवर लाँचनंतरचं फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अद्याप अॅमेझॉननं सेल कधी सुरू होणार याबाबत माहिती दिली नाहीये. एमआय ए३चे फिचर्स अॅमेझॉननं लाँच टीजरनुसार स्मार्टफोनमध्ये एआय ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच एआय सेल्फी कॅमेरा आणि अँड्रोइड वन ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे. श ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेले दोन वेरियंट लाँच करण्याच्या तयारीत आहेत. >>डिस्प्लेः ६.००८ इंच >> प्रोसेसर - स्नॅपड्रॅगन ६५५ >> बॅटरी- ४०३० एमएच >> कॅमेरा सेटअप- ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप ( ४८ MP+ ८Mp+२Mp), सेल्फिसाठी ३२ मेगापिक्सल कॅमेरा


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2H8uXhV

Comments

clue frame