मुंबईः चीनी कंपनी शाओमी एक खास स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये सोलार पॅनलचा वापर केला जाणार आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन उन्हातही चार्ज होणार आहे. शाओमी मोबाईल सॉफ्टवेअरनं मागील वर्षी स्मार्टफोनसाठी सोलर सेल मॉड्युलचं पेटेंट कंपनीच्या नावे करुन घेतलं होतं. शाओमीच्या या पेटेंटमध्ये फोनचे काही डिजाइनही दिले आहेत. या नव्या स्मार्टफोनमध्ये नो नॉच डिस्प्ले आहे. शाओमी या फोनसाठी इन-डिस्प्ले कॅमेरा टेक्नोलॉजीचा वापर करण्याची शक्यता आहे. सोलार पॅनल असेल फोनचा यूएसपी फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. तसंच फोनच्या मागे असलेल्या दोन कॅमेऱ्यांच्या मध्ये एलईडी फ्लॅश असेल. बॅक पॅनेलमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला नाही. त्यामुळं फोनच्या डिस्प्लेला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येण्याची शक्यता आहे. फोनच्या मागे असलेला स्मार्टफोनचा यूएसपी असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोलार पॅनेल फोनच्या कॅमेरा मॉड्यूलपेक्षा ही लहान असणार आहे. सोलारवर चार्ज करता येणार फोन फोनच्या मागे असलेल्या सोलार पॅनेलमुळं सोलार एनर्जीच्या मदतीने फोन चार्ज होईल. कंपनीनं हा स्मार्टफोन कधी लाँच होईल हे मात्र अद्याप स्पष्ट केलं नाहीये.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YHcMWE
Comments
Post a Comment