नवी दिल्ली: अॅपलने आयओएस डिव्हाइसवर २०१८ मध्ये 'मीमोजी' आणले होते. तेव्हापासून युजर्स या मीमोजींच्या प्रतीक्षेत होते. लवकरच आयफोन युजर्सना हे वापरता येणार आहेत. WABetaInfo च्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या फिचरशी संबंधित स्क्रीनशॉट्सही साईडने दिले आहेत. यानुसार, व्हॉट्स अॅपचं iOS बीटा व्हर्जन २.१९.९०.२३ मध्ये यूजर्सना मीमोजी स्टीकर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. X, iPhone XS, iPhone XS Max आणि XR या फोनमध्ये हे फिचर दिसणार आहे. हे कस्टमाइज एनिमोजी युजरची पर्सनालिटी आणि मूड शी मॅच करून डिझाइन करता येतात. या मीमोजींना मेसेज आणि फेसटाइम दोहोंमध्ये वापरता येईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30vKYWV
Comments
Post a Comment