'या' देशांमध्ये व्हाट्सअॅपवर बंदी

मुंबई: व्हाट्सअॅप आज जगातील एक अत्यंत लोकप्रिय अॅप ठरलं आहे. मित्रांशी संपर्क करण्यासाठी, फोटो, स्टेटस, स्टोरी शेअर करण्यासाठी जगभर आज व्हाट्सअॅपचा वापर केला जातो. पण जगातले काही देश असेही आहेत जिथे व्हाट्सअॅपवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत या देशांनी व्हाट्सअॅपवर बंदी घातली आहे. पण या बंदीमागील खरी कारणं जाणून घेऊया चीन: देशात राजकीय प्रचार सुरू असल्यामुळे व्हाट्सअॅपवर बंदी घातल्याचं बोललं जातं आहे. प्रक्षोभक माहिती देणारे मॅसेजेस देशभर व्हायरल होऊ नये म्हणून ही खबरदारी चीन सरकारने घेतली आहे. तसंच सरकारविरोधात कोणी बोलू नये म्हणूनही व्हाट्सअॅपवर बंदी घातल्याची चर्चा आहे. दरम्यान ही बंदी तात्पुरती असून नंतर हटवली जाईल असं स्पष्टीकरण चीन सरकारने दिलं आहे. नॉर्थ कोरिआ किम जोंग उनच्या हुकुमशाहीमुळे खूप कमी वेळ इंटरनेटचा वापर या देशातील लोकांना करता येतो. जेव्हा सरकारची इच्छा असेल तेव्हा इंटरनेट बंद केलं जातं ,जेव्हा सरकारला वाटेल तेव्हा पुन्हा सुरू केलं जातं. यामुळेच या देशात फेसबुक, व्हाट्सअॅपचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. क्यूबा क्यूबा या देशावर युरोपियन युनियननेही बंदी घातली आहे. हा युरोपातील अत्यंत गरीब देश आहे. या देशात इंटरनेट अत्यंत महाग असल्यामुळे व्हाट्सअॅपवर बंदी आहे. सामान्य लोकांचे उत्पन्न इंटरनेटच्या किमतीहून कमी आहे. इराणमाध्यम स्वातंत्र्यावर इराणने चाळीस वर्षांपूर्वीच गदा आणली आहे. सुरक्षा आणि सेंसरशिपचं कारण देऊन या देशाने अनेकदा व्हाट्सअॅपवर बंदी घातली आहे. सिरीया राजकीय अस्थिरतेमुळे फेसबुक, व्हाट्सअॅपसह अनेक सोशल मीडिया साइट्स सिरीयामध्ये बॅन करण्यात आल्या आहेत. जर कोणी या साइट्सचा, अॅप्सचा वापर केलाच तर त्याला लगेच अटक करण्यात येते. युएईव्हाट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग करण्यास या देशामध्ये बंदी आहे. हा देश स्थानिक टेलिकॉम कंपनीजला झुकते माप देतो. त्यांचा व्यापार वाढावा म्हणून व्हाट्सअॅप कॉलिंगवर बंदी घालण्यात आली आहे. या देशात राहणाऱ्या भारतीय, पाकिस्तानी आणि बांग्लादेशी नागरिकांना यामुळे व्हाट्सअॅपचा वापर करता येत नाही.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TOMy3A

Comments

clue frame