नवी दिल्लीः स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअरचे अपडेट्स देण्यात सर्वात आघाडीवर आहे. डिव्हाइसेजचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षित अपडेट्स देण्याबाबतचा एक सर्व्हे काउंटरपॉइंट रिसर्चनं नुकताच केला असून यात नोकियाने बाजी मारली आहे. नोकियाने चीनची कंपनी शाओमी आणि सॅमसंग या आघाडीच्या कंपनीला मागे टाकले आहे. स्मार्टफोनमधील सॉफ्टेअर अपडेट्स करण्याला आधी जास्त महत्त्व दिले जात नसत. परंतु, आता यात बदल झालेला पाहायला मिळत आहे. ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट्स हवे आहेत. त्यामुळे कंपनीने वेळोवेळी अपडेट्स द्यावेत अशी ग्राहकांची मागणी आहे. अपडेट्स देण्यात नोकिया अग्रेसर आहे. नोकियाचे ९६ टक्के स्मार्टफोन अँड्रॉयड ९ पायवर आधारित आहेत. तर ४ टक्के अँड्रॉयड ऑरियावर आधारित आहेत. २०१३ पासून कंपनीने अँड्रॉयड ९ पाय ओएससोबत स्मार्टफोनमध्ये नियमित अपडेट देण्यास सुरुवात केली आहे. सॉफ्टवेअर अपडेट देण्यात नोकिया नंबर वनवर आहे. तर ८९ टक्क्यांसह सॅमसंग दुसऱ्या स्थानावर आहे. शाओमी ८४ टक्क्यांसह तिसऱ्या नंबरवर व ८२ टक्क्यांसह हुवावे चौथ्या नंबरवर आहे. लिनोवाने ४३ टक्के अँड्रॉयड पाय स्मार्टफोन आणि ओप्पोने ३५ टक्के अँड्रॉयड पाय ओएस वर आधारित स्मार्टफोन अपडेट केले आहेत. विवो, एलजी, अल्काटेल आणि टेक्नो या कंपन्यांनी फारसे अपडेट केले नाही. विवोने १८ टक्के, एलजीने १६ टक्के सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट दिले आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HAqaGp
Comments
Post a Comment