विमानात अॅपलचा लॅपटॉप? नक्को रे बाबा!

नवी दिल्ली: युरोप आणि अमेरिकन एअरलाइन्स नियमांतर्गत भारतातही आता अॅपलच्या काही उत्पादनांना विमानात बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. तूर्त तरी परदेशातून भारतात आलेल्या विमानांमध्ये मॅकबुक प्रोचे काही मॉडेल्स ने-आण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बॅटरीत आग लागण्याच्या भितीने मॅक बुकची काही उत्पादने आता विमानात नेता येणार नाहीत. परिणामी अॅपलने जुन्या जनरेशनच्या १५ इंच मॅकबुक प्रो मॉडल्सना मार्केटमध्ये पुन्हा आणण्याची घोषणा केली आहे. युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजंसी आणि युएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने लॅपटॉप विमानात सोबत बाळगण्यास मज्जाव केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ही बंदी आणली आहे. सिंगापूर एअरलाइन्स आणि थाई एअरवेजनेदेखील ही बंदी त्यांच्याकडे लागू केली आहे. भारतात अद्याप बंदी नाही असं पहिल्यांदाच झालेलं नाही. २०१६ मध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ च्या मोबाईल फोनला विमानात मज्जाव होता. अॅपल मॅकबुक प्रो १५ इंच प्रकरणी आतापर्यंत कुठल्याही देशांतर्गत विमान कंपनी किंवा डीजीसीएने कोणतीही बंदी आणलेली नाही. मात्र धोका पाहता अशी बंदी का नाही, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2L8klkh

Comments

clue frame