मुंबई:चीनची टेक कंपनी शाओमीने एक नवं प्रोडक्ट लॉन्च केलं आहे. हा आहे एक खास प्रिंटर. हा प्रिंटर इतका लहान आहे ती तो खिशातही सहज मावतो. Youdao Memobird G4 हा एक थर्मल आहे. हा आपल्या स्मार्टफोनशी ब्लूटूथने कनेक्ट होतो. यासोबत येतो एक प्रिंटर अॅप. हे अॅप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल केलं की झाला प्रिंटर रेडी! विशेष म्हणजे या अॅपमध्ये प्राथमिक शाळेपासून अगदी उच्च माध्यमिक शाळेचा अभ्यास, मल्टीपल क्वेश्चन डेटाबेससह दिला आहे. मात्र या प्रिंटमध्ये केवळ ब्लॅक अँड व्हाइट प्रिंट येतात. या हाय-डेफिनिशन प्रिंटरमध्ये ३०६dpi क्लॅरिटीसह प्रिंट येतं. थर्मल प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने हा प्रिंटर ब्लूटूथने कनेक्ट होऊन प्रिंट करतो. या प्रिंटरचं वजन अवघं १६५ ग्राम आहे. या प्रिंटरमध्ये ९००mAh ची लिथिअम आयन बॅटरी आहे. हा प्रिंटर केवळ दोन तासांत पूर्ण चार्ज होतो. पूर्ण चार्ज प्रिंटरमध्ये पेपरचे ८ रोल प्रिंट होऊ शकतात. सध्या हे डिवाइस Youpin वर प्री-ऑर्डर करून मागवता येत आहे. याची किंमत ४२ डॉलर्स (सुमारे २,९७५ रुपये) आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M6mNe8
Comments
Post a Comment