व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट झाले? 'असे' करा रिस्टोअर

नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपचे जगभरात अनेक यूजर्स आहेत. जवळपास सर्वच स्मार्टफोनधारक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. चॅटिंग व मेसेजिंग सोबतच फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, लोकेशन आणि विविध डॉक्यूमेंट्स शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. अशात काही महत्वाचे चॅट्स किंवा फोटो, व्हिडिओ डिलिट झाले तर मोठी पंचायत होते. पण आनंदाची बाब अशी की, हे डिलीट झालेले चॅट्स पुन्हा रिस्टोअर करता येतात. साधारणत: यूजरच्या डिव्हाईसवर व्हॉट्सअॅपचा तयार झालेला असतो. सेटिंग्सनुसार दर आठवड्याला किंवा महिन्याला हा बॅकअप आपोआप अपडेट होत राहतो. मात्र, व्हॉट्सअॅपने पुरवलेल्या या बॅकअप व्यतिरिक्त काही यूजर्स गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लाऊड वरही बॅकअप ठेवतात. त्यामुळे चॅट्स डिलिट झाले तर, ते परत रिस्टोअर करण्यासाठी पुढील पद्धती वापरता येतील- गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाऊडच्या मदतीने - चॅट डिलीट झाले तर अनइन्स्टॉल करावे. - प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर वरून परत ते इन्स्टॉल करावे. - सेटिंग्स करताना जुन्या नंबरचाच वापर करावा. - यानंतर बॅकअप रिस्टोरचा पर्याय दिसेल; तो निवडावा. - त्यानंतर डिलीट झालेले व न झालेलेल सगळे चॅट्स पुन्हा दिसू लागतील. लोकल बॅकअपच्या मदतीने मेसेज किंवा चॅट्स डिलिट झाल्यावर ऑटो बॅकअप झाला असेल तर, हे डिलिट झालेले चॅट्सवरील पद्धतीने परत येणार नाहीत. अशावेळी चॅट्स रिस्टोअर करण्यासाठी लोकल बॅकअप पद्धत वापरावी लागेल. ही पद्धत फक्त अँड्रॉइड मोबाईलवर वापरता येईल. - अॅंड्रॉइड फोनमधील फाइल मॅनेजरमध्ये जा. - येथे व्हॉट्सअॅप नावाच्या एका फोल्डरमध्ये नावाचा आणखी एक फोल्डर असेल. - या डाटाबेस फोल्डरमध्ये अनेक फाइल्स असतील. त्यातील msgstore.db.crypt12 ही फाइल महत्त्वाची आहे. - या फाइलचे नाव बदलून msgstore-newest.db.crypt12 असे करावे. - आता या डाटाबेस फॉल्डरमधील दुसऱ्या एका फाइलचे नाव बदलून msgstore.db.crypt12 असे करावे. - गुगल ड्राइव्हमध्ये जाऊन मागील बॅकअप डिलिट करावा. यासाठी ड्राइव्ह अॅपच्या मेन्यूमधुन बॅकअपमध्ये जावे लागेल. - आता व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे. - व्हॉट्सअॅप सेटिंग्स झाल्यावर लोकल बॅकअप रिस्टोर असा पर्याय दिसेल. येथे रिस्टोर हा पर्याय निवडल्यावर डिलीट झालेले चॅट्स पुन्हा दिसू लागतील.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YwRjnX

Comments

clue frame