मुंबईः राँग नंबर किंवा कंपनीकडून येणारे फोन ओळखण्यासाठी ट्रूकॉलर किंवा ट्रॅपकॉलसारखे अॅप युजर्सकडून वापरले जातात. मात्र, स्पॅम कॉल्स आणि राँग नंबर ओळखण्याबरोबरच हे अॅप युजर्सचा डेटा चोरत असल्याचं समोर आलं आहे. एका अहवालानुसार असे अॅप्स सुरू करताच युजर्सच्या प्रायव्हसीला धक्का पोहचू शकतो. तसंच हे अॅप्स युजर्सचा डेटा थर्ड पार्टी कंपनीला विकत असल्याचं बोललं जात आहे. एनसीसी ग्रुप या सायबर सिक्युरिटी कंपनीनं काही अॅप्सचं परिक्षण केलं. यामध्ये टॅपकॉल, ट्रूकॉलर आणि हिया हे अॅपची चाचणी केली. या कंपनीनं सादर केलेल्या अहवालात हे अॅप्स युजर्सच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. थर्ड पार्टी कंपनीला पाठवतात डेटा टॅप कॉल नावाचं अॅप युजर्सच्या परवानगी शिवाय त्यांचा खासगी डेटा थर्ड पार्टी एनलिटिक्स कंपनी अॅप्स फ्लॅअरला पाठवत आहे. मात्र, अॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला नाहीये. परवागनीशिवाय डेटा अपलोड ट्रूकॉलर आणि हिया सारखे अॅप्स युजर्सनं प्रायव्हसी पॉलिसीबाबत परवागनी देण्याआधीच डिव्हाइस डेटा अपलोड करतात. या डेटामध्ये डिव्हाइस टाइप, मॉडल आणि सॉफ्टवेअरची माहिती असते. एनसीसी ग्रुपनं या अॅप्सनं अॅपल कंपनीसोबत संपर्क साधल्यानंतर अॅपलनं ट्रॅपकॉलनं प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ट्रूकॉलरचे प्रवक्ता मनन शाह यांनीही अॅप सुरू असल्यावर युजर्सचा डेटा अपलोड होतो हे मान्य केलं. मात्र, ट्रूकॉलरनं यावर उपाय शोधून यापुढं असं होणार नसल्याचं म्हटलं आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2To9TZN
Comments
Post a Comment