जिओ गिगा फायबर: 'या' ग्राहकांना फ्री सर्व्हिस

मुंबई: गिगाफायबरचं लाँचिंग येत्या ५ सप्टेंबरला होत आहे. यावेळी कंपनी ग्राहकांना अनेक ऑफर्स देणार आहे. गॅजेट्स नाऊच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओफायबर प्रिव्ह्यू कस्टमर्सना एक स्पेशल सरप्राइज देऊ शकते. यात दोन महिने मोफत जिओफायबर सर्व्हिससह अनेक ऑफर्सचा समावेश आहे. आणखी कुठल्या ऑफर्स असू शकतील ते पाहू - फ्री जिओफायबर सर्व्हीस यात सर्व जिओ प्रिव्हू कस्टमर्सना सुरुवातीचे दोन महिने मोफत जिओ फायबर सर्व्हिस मिळणार आहे. आता जे जिओ फायबर टू द होम सबस्कायबर्स आहेत, त्याना याया लाभ मिळणार आहे. १५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट १५०० रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल असेल. दहा हजार रुपयांचा प्रिमियम प्लान जिओ गिगाफायबर प्लानची सुरुवात ७०० रुपयांपासून होईल. सर्वात महागडा प्लान १० हजार रुपये प्रति महिना असेल. या कनेक्शनसोबत लँडलाइन मधून देशभर फ्री कॉलिंग करता येणार आहे. 4K LED टीव्ही फ्री वेलकम ऑफरअतर्गत ग्राहकांना 4K LED टीव्हीसह 4K set top बॉक्स मोफत मिळणार आहे. या ग्राहकांना पुढील वर्षीपासून नवा सिनेमा ज्या दिवशी प्रदर्शित होईल त्याच दिवशी पाहता येणार आहे. १ जीबीपीएस इंटरनेट स्पीड प्लान आणि टॅरिफची कोणतीही माहिती कंपनीने सध्या दिलेली नाही. पण असं म्हटलं जात आहे की ५ सप्टेंबरला जिओ गिगाफायबर लाँच झाल्यावर माय जिओ मॅप आणि वेबसाइटवर याची माहिती दिली जाईल. यूजर्सना १०० Mbps पासून १ gbps पर्यंतचा स्पीड मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30M6OFD

Comments

clue frame