नोकियाचा २० हजारांचा स्मार्टफोन १० हजारांत

नवी दिल्लीः नोकियाच्या या स्मार्टफोनवर सध्या घसघशीत सूट मिळत आहे. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये हा फोन केवळ १० हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. लाँच झाला त्यावेळी या फोनची किंमत २० हजार ४९९ रुपये इतकी होती. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये ६ जीबी रॅम आहे. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या विक्रीत सध्या बंपर सूट दिली जात आहे. एचडीएफसी बँक डेबिट कार्डवरून हा मोबाइल खरेदी केल्यास अतिरिक्त ५ टक्के कॅशबॅक ग्राहकांना दिला जात आहे. म्हणजेच हा फोन ग्राहकांना केवळ १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. एक्सचेंज ऑफरचा पर्याय सुद्धा उपलब्ध असून ग्राहकांना ८ हजार ५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच मेजर क्रेडिट कार्ड्स आणि बजाज फायनान्सवर ईएमआयवर नो कॉस्टचा पर्याय देण्यात आला आहे Nokia 6.1 Plus ला गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे सॉफ्टवेअर खूप आधुनिक आहे. बाजारात सध्या सर्वात अपडेटेड स्मार्टफोन म्हणून या फोनकडे पाहिले जाते. तसेच यात लवकरच अँड्रॉयड क्यूचा सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ५.८ इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर, ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, ड्युअल रियर कॅमेरा आणि ३,०६० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KI3Jjh

Comments

clue frame