अकाउंट डिलीट न करता घ्या व्हॉट्सअॅपपासून ब्रेक

मुंबईः मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये अव्वल असलेलं तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. व्हॉट्सअॅपमुळं दूरचे मित्र, नातेवाईक यांच्यासोबत दररोज बोलणं होतं. ऑफिसचे ग्रुप, शाळेतील मित्रांचा ग्रुप, नातेवाईंकाचा ग्रुप अशा अनेक वेगवेगळ्या ग्रुपमुळं आपण जवळच्या व्यक्तींसोबत कनेक्ट असतो. मात्र कधी कधी या ग्रुप्सवर येणाऱ्या मेसेजमुळं हैराण व्हायला होतं. त्यामुळं युजर्स कधीकधी व्हॉट्सअॅप डिलीट करण्यापर्यंत विचार करतात. मात्र, व्हॉट्सअॅपपासून ब्रेक घेण्यासाठी डिलीट करण्याची काहीच गरज नाहीये. या ट्रिक्सच्या मदतीनं व्हॉट्सअॅप डिलीट न करताही तुम्हाला ब्रेक घेता येणार आहे. बॅकग्राउंड डेटा अॅक्सेस करा डिसेबल अॅप सेटिंगमध्ये जाऊन अॅपसाठी असलेले बॅकग्राउंड डेटा अॅक्सेस डिसेबल म्हणजेच बंद करा. त्याचबरोबर अॅप सुरू करण्यापूर्वी ज्या परवानग्या युजर्सकडून दिल्या जातात त्या बंद करा. या ट्रिकमुळं अॅप डिलीट न करताही व्हॉट्सअॅप डिव्हाइसवर बॅकग्राउंडमध्ये काम करेल. तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर मेसेजही वाचता येणार आहेत. व्हॉट्सअॅपसाठी मोबाइल डेटा ऑफ करा फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन व्हॉट्सअॅपसाठी मोबाइल डेटा अॅक्सेस बंद करा. अॅप्समध्ये जाऊन व्हॉट्सअॅपवर क्लिक करून फॉर्स स्टॉपया पर्यायवर क्लिक करा. नोटिफिकेशन पॉप अप डिसेबल ठेवा व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन आल्यास स्मार्टफोनमध्ये लाइट सुरू होते. त्यामुळं युजर्स सारखं लक्ष व्हॉट्सअॅपकडं जातं. नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये जाऊन नोटिफिकेशन लाइटसाठी नो हा पर्याय निवडा.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YWO1pe

Comments

clue frame