व्हॉट्सअॅपच्या आधी गुगल पेमध्ये येणार हे खास फिचर

मुंबईः भारतात 'गुगल पे' या मनी ट्रान्सफर अॅपला युजर्सची सर्वाधिक पसंती आहे. सतत ग्राहकांसाठी नवनवीन फिचर अपटेड करत असते. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपमध्ये डार्क मोड हे फिचर येणार असल्याची चर्चा होती. मात्र, व्हॉट्सअपचं हे बहुप्रतिक्षीत फिचर पहिले गुगल पेमध्ये येणार आहे. गुगलनं काही दिवसांपूर्वीच अँड्रोइड १० ऑपरेटिंग सिस्टिमची घोषणा केली. अँड्रोइड १० लाँच होण्याआधीच गुगल पेमध्ये डार्क मोड सुरू होईल. गुगल पेच्या 2.96.264233179 या व्हर्जनमध्ये डार्क मोड फिचर देण्यात आलंय हे लेटेस्ट व्हर्जन अपडेट झाल्यानंतर डार्क मोड फिचर आपोआप सुरू होणार आहे. स्मार्टफोनची बॅटरी लो झाल्यानंतर गुगल पेमध्ये डार्क मोड सुरू होईल. यामुळं बॅटरीची अधिक बचत होईल. गुगल पेमध्ये देण्यात येणारं डार्क मोडफिचर डीप ग्रेया थीमवर आधारीत आहे. ट्विटर, फेसबुक मेसेंजरमध्ये डार्क मोड फिचर आधीपासूनच होते. आता काही स्मार्टफोन कंपन्यादेखील युजर इंटरफेसमध्ये डार्क मोड फिचर देण्याच्या प्रयत्नात आहेत. रात्री स्मार्टफोनचा वापर करताना या फिचरचा वापर केल्यास मोबाईल स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांवर येत नाही. त्यामुळं डोळ्यांनाही त्रास होत नाही व बॅटरीचीही बचत होते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZtIFlJ

Comments

clue frame