मुंबईः बऱ्याच कालावधीपासून भारतीय बाजारपेठेतून गायब असलेल्या एचटीसी कंपनीनं पुन्हा एकदा भारतात धमाकेदार पुनरागमन केलंय. बुधवारी एचटीसीनं '' स्मार्टफोन लाँच केला. एचटीसीनं एक वर्षांपूर्वी भारतात डिजायर १२ आणि डिजायर १२+ लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीनं एचटीसी 'वाइल्डफायर एक्स'चे दोन वेरियंट लाँच केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 'माय बडी' फिचर मिळणार आहे. या फिचरमुळं युजर्सना पर्सनल सिक्युरिटी मिळणार आहे. एचटीसी 'वाइल्डफायर एक्स'ची भारतात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजची किंमत ९,९९९ रुपये आहे. तर, ४ जाबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १२,९९९ रुपये आहे. २२ ऑगस्टपासून ग्राहक फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करु शकणार आहेत. कंपनीनं दिलेल्या लाँच ऑफरमध्ये वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना ३, ७५० रुपयांचं कुपन आणि १८ महिन्यांसाठी ५०० जीबी डेटा रोज मिळणार आहे. एचटीसी वाइल्डफायर एक्सची वैशिष्ट्ये >>इंटरनल मेमरी- ३२ जीबी आणि १२८ जीबी >>कनेक्टिव्हीटी- ४जी, वाय-फाय, ब्लूट्यूथ, जीपीएस, यूएसबी टाइप- सी >>कॅमेरा- १२ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा, ५ मेगापिक्सल थर्ड कॅमेरा >> ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा >> बॅटरी- ३,३०० एमएएच, फोनची बॅटरी एआय टेक्नोलॉजीला सपोर्ट करते >> स्मार्टफोनच्या मागे फ्रिंगरप्रिंट सेन्सर
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31G3YSS
Comments
Post a Comment