'अॅपल सिरी'कडून सेक्स दरम्यानच्या गप्पांचे रेकोर्डिंग

नवी दिल्ली : अॅपलचे व्हर्च्युअल असिस्टंट सिरी युजर्सच्या सगळ्याच चर्चांचे करत असल्याचे समोर आले आहे. अगदी पार्टनरसोबत सेक्स करतानाच्या गोष्टी थर्ड पार्टी ऐकण्यासोबत रेकोर्डिंग करत होते. मागील काही दिवसात अॅमेझॉन, गुगल आणि अॅपलच्या व्हर्च्युअल असिस्टंटबाबत चर्चा झडत आहेत. या कंपन्यांचे थर्ड पार्टी कर्मचारी युजर्सच्या ऑडिओ क्लिप ऐकत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील गांभीर्य ओळखत अॅपलने नुकतेच थर्ड पार्टीसाठी काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांना कमी केले. पश्चिम आयर्लंडमधील कॉर्क शहरातील अॅपलच्या थर्ड पार्टीचे कर्मचारी युजर्सच्या खासगी चर्चाही ऐकत असत. यामध्ये जोडीदारांमधील खासगी क्षणांच्या वेळी होणाऱ्या चर्चेचे रेकोर्डिंग होते. त्याशिवाय अॅपल सिरीच्यामाध्यमातून व्यावसायिक करार, अंमली पदार्थांबाबतच्या चर्चांचे रेकोर्डिंग हे कर्मचारी ऐकत होते. एका रिपोर्टनुसार, हे कर्मचारी सिरीच्या माध्यमातून रेकोर्ड होणाऱ्या चर्चांची वर्गवारी करत होते. सिरीला देण्यात येणाऱ्या व्हाइस कमांडच्या क्षमता अधिक अचूक करण्यासाठी या रेकोर्डिंगची मदत घेण्यात येत होती असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही युजर्सची ओळख गुप्त ठेवत होतो. या रेकोर्डिंग काही सेकंदाच्या होत्या. कधी कधी आम्ही युजर्सचा पर्सनल डेटा आणि खासगी चर्चाही ऐकायचो. मात्र, यामध्ये सिरीला देण्यात येणाऱ्या व्हाइस कमांडचा समावेश असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने सांगितले. अॅपल सिरीच्या माध्यमातून आपला आवाज, चर्चा रेकोर्ड केल्या जात असल्याची माहिती युजर्सदेखील नव्हती. सध्या अॅपलने ट्रान्सस्क्रिप्शन थांबवण्यात आले आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ztea3u

Comments

clue frame