मुंबई: जर तुम्ही अॅपल किंवा सॅमसंगचा फोन वापरत असाल तर थोडं सावध व्हा. या दोन्ही कंपन्यांविरोधात अमेरिकेत खटला दाखल झाला आहे. या कंपन्यांच्या स्मार्टफोन्समधून घातक अशा रेडिओ फ्रिक्वेन्सीज् बाहेर पडतात, ज्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. कॅलिफोर्नियाच्या एका कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात असं म्हटलंय की सॅमसंग आणि अॅपल स्मार्टफोन फेडरल कमिशनने ठरवून दिलेल्या उत्सर्जन मर्यादेचे उल्लंघन करत आहेत. iPhone 7 Plus, iPhone 8, iPhone X, Galaxy S8 आणि Galaxy Note 8 या फोनमध्ये विशेषत: ही समस्या आहे. शिकागो लवादाने देखीस या स्मार्टफोन्समधून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची चौकशी केली होती. आयफोन ७ ची रेडिओ फ्रिक्वेन्सी कायदेशीर सुरक्षा नियमानुसार जास्त आहे. अॅपलने तर त्यांच्या स्मार्ट फोनच्या चाचणीदरम्यान नियामकांना आपल्या डिव्हाइसची जी फ्रिक्वेन्सी सांगितले, तीही नियमापेक्षा दुप्पट होती. कॅन्सरचा धोका दोन्ही कंपन्यांविरोधात दाखल खटल्यांमध्ये रेडिएशनचा धोकाही सांगितलो आहे. जास्त रेडिओ लहरींमुळे वापरकर्त्यांना कर्करोग आणि मानसिक आजार होण्याचा धोका असतो, असं याचिकांमध्ये म्हटलं आहे. अॅपलचं उत्तर अॅपलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, 'आयफोन ७ सह आमचे सर्व आयफोन FCC सर्टिफाइड आहेत. जेथे या फोन्सची विक्री होते, त्या देशांनीही त्यांना प्रमाणित केले आहे. आम्ही सर्व मार्गदर्शक तत्वे आणि मर्यादांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत.' सॅमसंगकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZtvlxG
Comments
Post a Comment