मोटोरोलाचा पहिला अल्ट्रा-वाइड अॅक्शन कॅमेरा फोन

मुंबई: मोटोरोलाने भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमत १३,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ४जीबी रॅम आणि १२८जीबी च्या स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये पहिल्यांदाच अल्ट्रा-वाइड अॅक्शन कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या फोनची विक्री ३० ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सिंगल चार्जवर या स्मार्टफोनची बॅटरी पूर्ण दिवस चालते. Motorola One Action मध्ये अँड्रॉइडचं अद्ययावत व्हर्जन आहे. या फोनमध्ये दोन गॅरंटीड ऑपरेटिंग सिस्टिम अपग्रेड आणि तीन वर्षांसाठी मासिक सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. Motorola One Action मध्ये ६.३ इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. हा स्मार्टफोन Android 9 Pie वर चालतो. वन अॅक्शनसोबत कंपनीने व्हिडिओ कॅमेऱ्यावर फोकस केला आहे. १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. हा कॅमेरा ११७ डिग्री व्ह्यूसह अल्ट्रा-वाइडमध्ये व्हिडिओ शूट करतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2L5jUHo

Comments

clue frame