नवी दिल्ली: या ई-कॉमर्स कंपनीने मोबाइल विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी सुरक्षा प्लान लाँच केला आहे. या प्लानला 'कम्पलीट मोबाइल प्रोटेक्शन' (cpm) हे नाव देण्यात आले आहे. या प्लानच्या अंतर्गत ग्राहकांना मोफत ब्रँड अधिकृत रिपेअर किंवा बदलून मिळेल. या प्लानची सुरुवातीची किंमत ९९ रुपये असेल. या प्लानमध्ये ब्रेकेज, लिक्विड डॅमेज, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसंबंधित समस्या सोडवल्या जाणार आहे. घरपोच डिलिव्हरी फ्लिपकार्ट कंपनीद्वारे या सर्विसअंतर्गत दुरुस्त केलेल्या स्मार्टफोनची घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे. शाओमी, ओप्पो, पोको, रियलमी, सॅमसंग, अॅपल, हॉनर, अॅसुस, इन्फिनिक्स आणि अन्य काही ब्रँडबरोबर हा प्लान मिळणार आहे. या क्रमांकावर करा कॉल या इन्शुरन्सवर दावा ठोकण्यासाठी १८०० ४२५ ३६५ ३६५ या क्रमांकावर कॉल करून आपली पॉलिसी आयडी शेअर करावी लागणार आहे. आपल्या मोबाइलची स्क्रीन तुटली असेल किंवा लिक्विड डॅमेज असेल, तर आपल्या ई-मेल आयडीवर लिंक पाठवण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५०० रुपये फी द्यावी लागेल. पहिला 'पिक अप' आणि 'ड्रॉप' मोफत असेल. १० दिवसात पुन्हा मिळेल मोबाइल फ्लिपकार्ट कंपनीकडून दहा दिवसांच्या आत मोबाइल परत मिळेल. दहा दिवसांच्या आत मोबाइल न मिळाल्यास, फ्लिपकार्टकडून ५०० रुपयांचे गिफ्ट वाउचर मिळेल. या प्लानमध्ये तुम्ही एकदाच बार डॅमेज स्क्रीन आणि लिक्विड डॅमेजचा दावा ठोकू शकता.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z6GzNi
Comments
Post a Comment