नवी दिल्ली: चिनी कंपनी 'वन प्लस' लवकरच एक नवीन टीव्ही लॉंच करणार असून त्याचं नाव ' टीव्ही' असणार आहे. वन प्लसने ऑफिशियल फोरमवर याबाबत पोस्ट लिहून माहिती दिली आहे. तसंच या टीव्हीच्या ऑफिशियल लोगोचाही कंपनीने खुलासा केला आहे. या टीव्हीचे नाव वन प्लस टीव्ही का ठेवलं हेही आपल्या पोस्टमध्ये वन प्लसने स्पष्ट केलं आहे.' दुसऱ्या कोणत्याही नावापेक्षा आमच्या कंपनीचं नाव जास्त चांगल्याप्रकारे आमच्या ब्रॅण्डचं आणि दर्जाचं प्रतिनिधित्व करेल'. यासोबत वन प्लस टीव्हीचा लोगोही जाहीर करण्यात आला आहे. या लोगोमध्ये वन प्लस (1+) समोर टीव्ही लिहिलं असणार आहे. हा टीव्ही सप्टेंबरमध्ये लॉंच होणार आहे. २६ सप्टेंबर हा टीव्ही लॉंच होण्याची संभाव्य तारीख असू शकते. वन प्लसच्या नवीन टीव्हीचं नाव काय ठेवावं यावर बरीच चर्चा करण्यात आली होती. चांगल्या नावासाठी स्पर्धाही घेण्यात आली होती. पण अखेर वन प्लस टीव्ही हेच नाव निश्चित करण्यात आलं आहे. हा एकाच वेळी काही व्हेरिएंट्समध्ये लॉंच करण्यात येऊ शकतो.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2P8OuW6
Comments
Post a Comment