मुंबई: जर तुम्हाला क्रेडिट कार्डाच्या रिवॉर्ड पॉइंट्ससंदर्भात कोणता एसएमएस आला तर सावध व्हा. हा मेसेज सायबर चोरांकडूनही आलेला असू शकतो. या मेसेजद्वारे तुमच्या बँक अकाउंटची पूर्ण माहिती मिळवून ते तुमच्या खात्यातील पैसै लंपास करू शकतात. लोकांना मोठ्या संख्येत क्रेडिट कार्डाचे रिवॉर्ड्स पॉइंट्स रिडीम करण्यासंबंधी मेसेज पाठवून फसवणाऱ्या एका ३२ वर्षीय ठगाला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीचं नाव विकास झा असून त्याने आपल्या साथीदारांसोबत शेकडो लोकांना क्रेडिट कार्डाचे रिवॉर्ड पॉइंट्स घेण्यासंदर्भात मेसेज पाठवले, जेणेकरून लोकांचे गोपनीय बँक डिटेल्स मिळवता येतील. झा पूर्वी एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करायचा. आपला बिझनेस सुरू करण्यासाठी त्याने नोकरी सोडली. जेव्हा त्याचा बिझनेस अपयशी ठरू लागला तेव्हा त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर त्याने लोकांना फसवण्यासाठी केला. कशी होते फसवणूक? विकासने अविनाश, अरुण कुमार आणि दोन सिम कार्ड वेंडर्सला हाताशी घेऊन काम सुरू केलं. त्याने लोकांना पाठवण्यासाठी एक टेक्स्क्ट मेसेज तयार केला. 'तुमच्या क्रेडिट कार्डवर खूप जास्त रिवॉर्ड्स पॉइंट्स तयार झाले आहेत. यांचा उपयोग तुम्ही कॅशबॅक ऑफर्स किंवा सवलती मिळवण्यासाठी करा. रिवॉर्ड पॉइंट्स संपवण्यासाठी एसएमएस मध्ये दिलेल्या लिंकलर क्लिक करा आणि एक अर्ज भरा,' असंही त्यात लिहिलेलं असे. लिंकवर क्लिक करताच kotekcardredeem.com या बनावट वेबसाइटवर आपण पोहोचतो. तेथे लोकांचं नाव, ईमेल, पासवर्ड, मोबाइल क्र. कार्ड डिटेल्स आणि आपला ३ अंकी CCV अशी सर्व माहिती देण्यास सांगण्यात येते. ही माहिती थेट त्या सायबर चोरांपर्यंत पोहोचते. क्रेडिट कार्ड ओटीपी ईमेल आयडीवर जातो. अशा पद्धतीने ई-वॉलेट्सचा वापर करून विकास आणि त्याचे साथीदार लोकांना फसवत होते. पोलिसांच्या टीमनं या कॉल सेंटरमधून ९-५ लाख रुपये कॅश आणि ९ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक राउटर आणि ४० सिम कार्ड जप्त केले.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YZFarP
Comments
Post a Comment