तुमचा स्मार्टफोन हरवलाय? 'असं' शोधा!

नवी दिल्ली: जर तुमचा हरवला असेल तर, तो सापडेल. निराश होऊ नका. फोन ट्रॅक करण्यासाठी तुम्ही गुगल अकाऊंटची मदत घेऊ शकता. अँड्रॉइड फोनमध्ये 'फाइंड माय डिव्हाइस' फीचर असतं. त्याच्या मदतीनं तुमचा हरवलेला स्मार्टफोन सापडू शकतो. इतकंच नाही तर, हरवलेल्या फोनमधील डेटाही तुम्हाला डिलिट करता येईल. मात्र, फोनमधील 'फाइंड माय डिव्हाइस' हे फीचर अॅक्टिव्हेट नसेल तर तुम्हाला फोन ट्रॅक करता येणार नाही. स्मार्ट फोनमधील 'फाइंड माय फोन' सर्व्हिस एनेबल करणं गरजेचं आहे. त्यामुळं फोन हरवला तरी तो सहज ट्रॅक करता येईल. बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये हे फीचर इन्स्टॉल असतं. पण नसेल तर, ते प्ले स्टोरवरून डाउनलोडही करता येईल. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन सेक्युरिटीवर टॅप करून डिव्हाइस अॅडमिनिस्ट्रेशनवर क्लिक करावं लागेल. फाइंड माय डिव्हाइससमोरील बॉक्सवर टिक केलेली आहे का याची खात्री करून घ्यावी. डिव्हाइसच्या लोकेशन सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन सर्व्हिसेसला डाव्या बाजूनं ऑन करा आणि मोडमध्ये हाय अॅक्युरसी सेट करा. याशिवाय गुगल अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन आणि गुगल लोकेशन हिस्ट्रीवर टॅप करावं. त्यानंतर यूज लोकेशन हिस्ट्रीसमोरील टॉगलला ऑन करा. डिव्हाइसच्या नावासमोरील टॉगलही ऑन करावं. गुगल मॅप्सची मदत घ्या सर्वच फोनमध्ये अॅप इन्स्टॉल असतं. त्याच्या मदतीनं हरवलेला फोन ट्रॅक करता येऊ शकतो. फोन ऑन असला तर वायफाय किंवा मोबाइल डेटा कनेक्ट असला पाहिजे. तसंच लोकेशन सर्व्हिसेसही ऑन असलं पाहिजे. त्यानंतर गुगल मॅप्स ओपन करून तुमच्या गुगल अकाऊंटला लॉग-इन करावं लागेल. वरच्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या मेन्यूवर क्लिक करून ते ओपन करावं लागेल आणि यूअर टाइमलाइन ऑप्शनवर क्लिक करा. डिव्हाइस लोकेशन हिस्ट्री कधीपर्यंतची हवी आहे याचाही पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळं तुमचा फोन कुठे-कुठे होता आणि आता कुठे आहे? याची माहिती मिळेल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KDWZUK

Comments

clue frame