सप्टेंबरमध्ये लाँच होणार सगळ्यात महागडा आयफोन

मुंबईः '' सिरीजनंतर कोणता नवा लाँच करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. नवीन आयफोन डिव्हाइस लाँच होण्यासाठी एक महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. सूत्रांनुसार, अॅपल 'आयफोन ११ प्रो' या नावानं आयफोन लाँच करणार आहे. फ्रेंच वेबसाइट 'आयफोन सॉफ्ट'नं दिलेल्या वृत्तानुसार, 'आयफोन एक्सएस मॅक्स'चं नवीन व्हर्जन सगळ्यात महाग असणार आहे. या फोनचं नाव 'आयफोन ११ प्रो मॅक्स' असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये लाँच आयफोन लाँच होणार आहे. हे असू शकतात फिचर >> 'अॅपल आयफोन ११'मध्ये खास फिचर देणार आहे. आयपॅडमध्ये असणारी 'अॅपल पेन्सिल' आता 'आयफोन ११'मध्येही असण्याची शक्यता आहे. >> अधिक क्षमतेची बॅटरी व तीन रिअर कॅमेरा नवीन फोनमध्ये आहेत. >> १० मेगापिक्सल फ्रंट क्रमेरा व १४ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. >> अॅपल कंपनी फोनच्या किंमतीत अधिक वाढ करणार नसल्याचं कळंतय. बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेनं आयफोनची विक्री वाढावी यासाठी कंपनी किंमतीत फारसा बदल करणार नसल्याचं बोललं जातं आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2H7wK74

Comments

clue frame