बंगळुरूः ग्राहक वाढवण्यासाठी फ्लिपकार्टने मोफत सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. ग्राहकांना आता फ्लिपकार्टवरून चित्रपट, व्हिडिओ आणि फ्री ऑफ चार्ज पाहता येणार आहे. छोट्या गावातील आणि छोट्या शहरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टच्या या निर्णयाचा भारतातील १६ कोटी लोकांना फायदा होणार आहे. पहिल्यांदा इंटरनेट हाताळणाऱ्या ग्राहकांना ऑनलाइनकडे आकर्षित करण्यासाठी व्हिडिओ, इंटरनेट आणि मनोरंजन हे तीन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने दिली आहे. फ्लिपकार्टचा सामना हा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओशी होईल. अॅमेझॉनवरून व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात तर फ्लिकार्टची सेवा ही निशुल्क असणार आहे. फ्लिपकार्टच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा अंतर्गत ग्राहकांना चित्रपट, शॉर्ट व्हिडिओ आणि वेब सीरिज पाहता येणार आहे. ही सेवा केवळ ज्या ग्राहकांकडे अॅप आहे त्यांनाच मिळणार आहे. कम्प्यूटर किंवा लॅपटॉपवर या सेवेचा आनंद ग्राहकांना घेता येणार नाही. ओरिजनल कंटेट मिळवण्यासाठी कोणासोबत पार्टनरशीप करणार आहे, याविषयी माहिती देण्यास कंपनीने टाळले आहे. सध्या व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या सेवेची चाचणी कंपनीतील काही मोजक्या ग्राहकांसोबत सुरू असल्याची माहिती आहे. परंतु, पुढील २० दिवसात सर्व ग्राहकांना ही सेवा मिळू शकणार आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MDjScl
Comments
Post a Comment