मुंबईः रिलायन्स समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यांनी बहुप्रतिक्षीत जिओ फायबरची घोषणा केली. ५ सप्टेंबरपासून जिओ गिगाफाबर ७०० ते १०, ००० रुपयांपर्यंत मिळणार आहे. तसंच गिगाफायबरच्या प्रमियम मेंबरशिपवर ग्राहक चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी घरबसल्या पाहू शकणार आहेत. रिलायन्स 'फर्स्ट डे फर्स्ट शो' ही नवी योजना घेऊन आली आहे. जुन २०२०पर्यंत ही सुविधा जिओ फायबरवर उपलब्ध होणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. या सुविधेमुळं ग्राहकांना सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच जिओ फायबरवर पाहता येणार आहे. मात्र ही सुविधा फक्त प्रिमियम मेंबरसाठी उपलब्ध असणार आहे. जिओनं एमआर हेडसेटचीही आज घोषणा केली आहे. या हेडसेटमुळं चित्रपट थ्रीडी स्वरुपात दिसणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z2jb2A
Comments
Post a Comment